लाडकी बहीण योजना महाराष्ट्र: Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली एक योजना आहे | या योजनेनुसार महाराष्ट्रातील महिलांना राज्य सरकार कडून दर महिन्याला आर्थिक सहायता प्रदान करण्यात येणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे त्याच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्याचे निर्णायक भूमिकेला मजबूत करणे हा आहे |

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra

आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील अनेक महिलांनी या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज केलेला आहे व तसेच त्यांना त्याचा फायदाही मिळालेला आहे पण अजूनही महाराष्ट्र मध्ये अशा काही महिला बाकी आहेत ज्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही तुम्हीही त्यापैकी एक असाल किंवा तुमच्या माहितीमध्ये अशी एखादी महिला असेल तर आत्ताही तुम्ही त्या महिलेचा या योजनेमध्ये फॉर्म भरू शकता कारण लवकरच महाराष्ट्र राज्य सरकारकडून या योजनेची तिसरी केस महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे|

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2024 (Mazi Ladki Bahin Yojana)

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण काय आहे ?

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana ही महाराष्ट्र राज्य सरकारी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे या योजनेनुसार महाराष्ट्रातील महिलेला सरकारकडून दर महिन्याला डायरेक्ट तिच्या बँक खात्यामध्ये ₹1500 रुपये मिळणार आहे |

या योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र महिलेला या योजनेच्या अधिकारी वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल व त्यानंतर सरकारकडून ते अर्ज स्वीकारले जातील अर्ज स्वीकारल्यानंतर महिलेला या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होईल |

आतापर्यंत या योजनेच्या अधिकारी पोर्टलवर एकूण 10535913 महिलेने ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवलेले आहे व त्यातील 9827672 महिलेचे अर्ज हे स्वीकारण्यात आलेले आहे व त्यांना या योजनेचा फायदाही मिळालेला आहे |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्टे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे द्वारे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट खालील प्रमाणे दिलेले आहे

  • महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे |
  • महाराष्ट्र राज्यातील महिलेला स्वालंबी व आत्मनिर्भर करणे |
  • महाराष्ट्र राज्यातील स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे |
  • महाराष्ट्र राज्यातील महिला आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या मुलाच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता

Mukhyamantri Mazi Ladki Bahin योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र महिलेला काही पात्रता पूर्ण करावे लागणार त्या खालील प्रमाणे दिलेला आहे|

  • या योजनेमध्ये अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे |
  • या योजनेमध्ये महाराष्ट्रातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिला व तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला अर्ज अर्ज करू शकते |
  • या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी महिलेचे वय हे 21 ते 65 वयोगटातील असणे आवश्यक आहे |
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे |

Mukhyamantri Mazi Ladki Bahin योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या सगळ्या पात्रता महिलेला पार करावे लागतील त्यानंतरच महिला या योजनेसाठी लाभार्थी होईल |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Mazi Ladki Bahin योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र महिलेकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते खालील प्रमाणे दिलेले आहे |

  • लाभार्थी महिलेचा आधार कार्ड
  • लाभार्थी महिलेचा बँक खाता तपशील ( बँक खाते आधार कार्ड असणे आवश्यक आहे )
  • लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो ( हमीपत्र डाऊनलोड करून कसा भरावा याबद्दल तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे )
  • अधिवास प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षे पूर्वीचे मतदान कार्ड किंवा राशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही डॉक्युमेंट चालेल |
  • महिलेचा जन्म परराज्यातील असेल तर तिच्या पतीचा पंधरा वर्षे पूर्वीचा मतदान कार्ड राशन कार्ड जन्म प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही डॉक्युमेंट चालेल |
  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे | पिवळी अथवा केशरी राशन कार्ड पत्रिका असेल तर उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही | शुभ्र किंवा कोणताही राशन कार्ड नसल्यास उत्पन्न प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे|
  • नवविवाहिताच्या बाबतीत राशन कार्ड महिलेच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित पत्तीचा राशन कार्ड हा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह धरला जाईल |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी

Mukhyamantri Mazi Ladki Bahin योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार अशा महिलेला मिळणार आहे व त्याचबरोबर कुटुंबातील एक अविवाहित मुलीला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे 21 ते 65 वयोगटातील महिलेला या योजनेचा लाभ मिळेल याकडे सरकारचे विशेष लक्ष आहे |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया ही महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही आता या योजनेमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकत नाही |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा भरावा

जसे की तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्यात आलेली होती ती तारीख आता वाढून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे पण या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने घरून अर्ज करण्याचा पर्याय हा सरकारने बंद केलेला आहे म्हणजे आता तुम्हाला या योजनेमध्ये घरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही |

त्यामुळे ज्या महिलानी या योजनेमध्ये अजूनही अर्ज केलेल्या नाही त्यांनी आपले अर्ज गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत , सेतू सुविधा केंद्र यांच्याकडून भरून घ्यावे कारण सरकारकडून आलेल्या नवीन जीआर नुसार फक्त याच लोकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे|

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती व्हिडिओ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट

महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून https://ladakibahin.maharashtra.gov.in/ हे अधिकारी पोर्टल तयार करण्यात आलेले आहे या पोर्टल द्वारे पात्र महिला या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात व तिने केलेल्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे की नाही हे सुद्धा चेक करून शकतात |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लास्ट डेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली होती पण महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांनी या तारखेपर्यंत अर्ज सबमिट न केल्यामुळे किंवा त्यांना अर्ज करण्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्यामुळे सरकारने या योजनेमध्ये महिलेला अर्ज करण्याची तारीख नवीन जीआर नुसार 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवलेली आहे म्हणजे ज्या महिलेने या योजनेमध्ये अर्ज केलेला नाही त्या महिलेकडे ३० सप्टेंबर 2024 पर्यंत वेळ आहे |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्लीकेशन स्टेटस कसा चेक करावा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स ला फॉलो करावे लागेल

  • सगळ्यात आधी योजनेच्या अधिकारी पोर्टलवर जावा |
  • त्यानंतर अर्जदार लॉगिन वर क्लिक करा |
  • पात्र महिलेचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता वेळेस जे मोबाईल नंबर आणि पासवर्ड तयार केले होते ते या ठिकाणी भरा |
  • त्याचबरोबर गुगल कॅपच्या कोड भरा व लोगिन वर क्लिक करा |
  • लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल |
  • या ठिकाणी तुम्हाला बरेच पर्याय दिसेल |
  • त्यामध्ये एक पर्याय दिलेला असेल यापूर्वी केलेले अर्ज त्यावर क्लिक करा |

आता तुमच्यासमोर तुम्ही पूर्वी केलेले अर्ज दिसेल हे अर्ज जर अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही पण जर तुमचा अर्ज काही कारणामुळे रिजेक्ट झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखविले जातील |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हेल्पलाइन नंबर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून अधिकारी पोर्टल तर लॉन्च केलेली आहेत पण त्याचबरोबर हेल्पलाइन नंबर सुद्धा तयार केलेला आहे जेणेकरून पात्र महिलेला या योजनेबद्दल अधिक माहिती करून घ्यायची असेल व योजनेमध्ये फॉर्म करताना बऱ्याच अडचणी येत असेल तर अशा महिला टोल फ्री नंबर 181 वर कॉल करू शकतात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण Yojana Gr Pdf Download

महाराष्ट्र राज्य सरकारकडून योजनेच्या अधिकारी वेबसाईटवर या योजनेबद्दल सहा सप्टेंबर 2024 रोजी नवीन जीआर प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये या योजनेच्या ऑनलाईन अर्ज भरण्याचा तारीख वाढीबद्दल माहिती दिलेली आहे हे जर जीआर तुम्हाला डाऊनलोड करून वाचायचे असेल तर तुम्ही Gr Pdf या ठिकाणी क्लिक करून ते डाऊनलोड करू शकता |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण Yojana 3rd Installment Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत व आता सरकारकडून बातमी समोर आलेली आहे त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की सप्टेंबर महिना समाप्त होईपर्यंत लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हफ्ता हा अर्ज Approve झालेल्या महिलेच्या खात्यामध्ये जमा केला जाईल | ज्या महिलेला आतापर्यंत सरकारकडून या योजनेचा एकही हप्ता प्राप्त झालेल्या नाही अशा महिलेला साडेचार हजार रुपये या हप्तेला सरकारकडून तिच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र डाऊनलोड कसा करावा

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana फॉर्म भरण्यासाठी हमीपत्र हा एक महत्त्वाचा कागदपत्र आहे ते डाऊनलोड करून तुम्हाला तुमच्या अर्जासोबत सबमिट करावे लागेल आता हे डाउनलोड कसे करावे यासाठी तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही तुम्ही सरळ या ठिकाणी क्लिक करून हे आम्ही पत्र डाऊनलोड करू शकता

HomeClick Here
Telegram ChannelClick Here
मित्रांनो आम्ही तुम्हाला Mukhyamantri Mazi Ladki Bahin योजनेबद्दल सगळी माहिती दिलेली आहे याशिवायझर या योजनेबद्दल तुम्हाला आणखी कोणतीही माहिती हवी असेल किंवा तुमच्या मनामध्ये या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता आम्ही लवकरच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू |
4/5 - (1 vote)
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now